बातम्या
धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल
By nisha patil - 2/28/2024 9:13:14 PM
Share This News:
धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल
मुंबई । मराठा आरक्षणासाठीचं उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केलीय. 3 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. अंतरवालीसह राज्यातील आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी तसंच सगेसोयरे कायद्यासाठी आजपासून पंतप्रधान, राष्ट्रपती यांना ईमेल करा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. मनोज जरांगेंनी सरकारला नवा इशारा दिलाय, मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला (Hunger Strike) बसतील असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला सरकारचा सगेसोयरे विषयावर चर्चाच करायची नाही, तोडगाच काढायचा नाही असा आरोपही जरांगेंनी केलाय..
जरांगे समर्थकावर गुन्हा
दरम्यान, जरांगेसमर्थकावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन मिनिटात अख्या ब्राह्मणांना संपवू अशी धमकी या तरुणाने दिली होती. काही दिवसांपासून तीन मिनिटात संपूर्ण ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी धमकी देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. याच प्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे या तरुणावर भा.द.वी. 153 अ व 506 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल
|