बातम्या

समाजाचे प्रबोधन करण्यासाठी रविवारी जातिअंत परिषदेचे आयोजन : डॉ. सुनिल पाटील

Caste based conference to be held on Sunday to educate the community


By nisha patil - 7/2/2024 11:34:34 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे  कोल्हापूर  - देशभरात धर्माधता आणि जातीयवाद फोफावत चाललाय.  जाती अंत होण्याऐवजी तो आता अधिकच बळकट होवू लागलाय. एकोप्यानं राहणा-या विविध समाजामध्ये फूट पडू लागली आहे. अशा घटनांना पायबंद बसवा, समाजाचं प्रबोधन व्हावं, यासाठी रविवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शाहू स्मारक भवन इथं जातिअंत परिषद आयोजित करण्यात आल्याची  माहिती नॅशनल ब्लॅक पॅन्थर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिलीय. 

या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणक हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत तर ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने हे या परिषदेचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यावेळी  आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष वाहरु सोनवणे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी  समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन डॉ. सुनिल पाटील यांनी केलय.


समाजाचे प्रबोधन करण्यासाठी रविवारी जातिअंत परिषदेचे आयोजन : डॉ. सुनिल पाटील