बातम्या

फिलाइन क्लब ऑफ इंडिया च्या वतीने कॅट शो उत्साहात...

Cat show on behalf of Feline Club of India in excitement


By nisha patil - 4/12/2023 7:35:28 PM
Share This News:



देशविदेशांतील मऊ मऊ मांजरांच्या अदा, नखरे आणि त्यांच्यात रंगलेल्या स्पर्धा, प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी दहा हजारांहून अधिक आबालवृद्धांनी गर्दी केल्याचे दिसून आले.फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने रविवारी महासैनिक दरबार हॉल येथे अनोखा कॅट शो आयोजित केला होता. त्यात सॅबेरियन, पार्शियन, इंडी माऊ, बैंगॉल टायगर अशा तीनशेहून अधिक मांजरांच्या पिंजऱ्यात राहूनही अदा पाहण्यासारख्या होत्या.गेली पाच वर्षे हा खास मांजरांसाठी निर्माण झालेल्या क्लबच्यावतीने खास देशविदेशांतील मांजरांचे अर्थात कॅट शो चे आयोजन केले जात आहे. यात कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता या क्लबने देशी इंडीमाऊसह परदेशातील विविध जातीची आणि वीस ते पाच लाखांपर्यंतच्या मांजरांचे प्रदर्शन कोल्हापूर नगरीत भरविले आहे. पाच वर्षात तीन वेळा झालेल्या प्रदर्शनाला अगदी दोन वर्षाच्या बालकांपासून ते नव्वदीतील आजोबा- आजींपर्यंतची मंडळी हा अनोखा मांजरांचा शो पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. अनेक मंडळी तर कोल्हापूरसह बंगळुरू, बेळगाव, सोलापूर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली आदी ठिकाणांहून सहभागी झाली होती.यावेळी मांजरांची निगा, त्यांचे आरोग्य, लसीकरण, आहाराची या कॅट शोमध्ये माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांकरिता प्राण्यांमध्ये गोडवा
निर्माण करण्यासाठी चाळीस हजार मोफत पासेस क्लबने वाटले होते. त्यामुळे दिवसभरात या शोच्या ठिकाणी लहानग्यांसह पालक मंडळींच्या रांगाच रांगा लागल्या असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. लहानग्यांच्या उत्साह तर ओसांडून वाहणारा होता. स्वयंसेवकांची सर्वांना आवर घालताना चांगलीच दमछाक झाली.


फिलाइन क्लब ऑफ इंडिया च्या वतीने कॅट शो उत्साहात...