बातम्या

सांगोल्यातील हाय प्रोफाईल महिला डॉक्टर ऋचा हिच्या आत्महत्येस कारणीभूत

Caused suicide of high profile female doctor Richa in Sangolya


By nisha patil - 12/6/2024 6:24:42 PM
Share This News:



 सांगोला येथील डॉक्टर ऋचा सुरज रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर माझाच्या दणक्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटातील नेते व उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना यांना रात्री उशिरा सांगोला पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे. वस्तुस्थिती  दाखवल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. वरिष्ठांकडून चौकशा सुरू झाल्यावर पोलिसांनी झटपट कारवाईला सुरुवात केली. कोल्हापूर  येथून सासरे उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना अटक करण्यात आली. तर, आत्महत्येसाठी जबाबदार असणारा पती डॉ. सुरज रुपनर यालाही पोलसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  त्याच्या अटकेसाठी विविध ठिकाणी टीम पाठवण्यात आल्या होत्यासांगोल्यातील हाय प्रोफाईल महिला डॉक्टर ऋचा हिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला पती डॉ. सूरज रुपनरला अखेर सांगोला मिरज रोडवरील नाझरे टोल नाक्यावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. थोड्याच वेळात पोलीस आरोपी सूरजला घेऊन पोहोचणार आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सूरज हा पोलिसांना चकवा देत होता. अखेर काल रात्री उद्योगपती वडील भावुसहेब रुपनर यांना अटक केल्यानंतर आता फरार असलेला सूरज पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.


सांगोल्यातील हाय प्रोफाईल महिला डॉक्टर ऋचा हिच्या आत्महत्येस कारणीभूत