बातम्या

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा : श्री.राजेश क्षीरसागर शिवाजी पेठ "रायगड" शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Celebrate this years Ganeshotsav with a bang


By nisha patil - 11/9/2023 6:00:01 PM
Share This News:



यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा : श्री.राजेश क्षीरसागर
शिवाजी पेठ "रायगड" शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


हिंदुत्वाच्या विचारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले महायुतीचे राज्य सरकार हिंदुत्वाबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे. गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव, दहीहंडी सणांवर लावलेले निर्बंध गतवर्षी पासून उठविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी असून, तालीम संस्था, मंडळांनी यंदाचाही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे यांच्या माध्यमातून शिवाजी पेठ येथे सुरु करण्यात आलेल्या "रायगड" शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
    

उद्घाटन समारंभप्रसंगी युगपुरुषाचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गेली ३७ वर्षे अखंडितपणे शिवसेनेचा भगवा निष्ठेने खांद्यावर घेतलेले शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे यांच्या "राजगड" शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.
    

याप्रसंगी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, शहरातील सर्वच गणेशोत्सव तालीम संस्था, मंडळांचे काम गणेशोत्सव सणापुरते मर्यादित नसून, समाजावर ओढावलेल्या प्रत्येक संकटात या संस्था अग्रभागी राहून समाजहिताच्या कार्यात योगदान देतात. परंतु गेल्या काही वर्षात गणेशोत्सव सारख्या हिंदू सणांवर सरकारने निर्बंध आणले होते. गणेशोत्सव काळात मंडळांची होणारी गळचेपी याविरोधात शिवसेना नेहमीच मंडळाच्या सोबत उभी राहिली आहे. सर्वसामन्यांना न्याय देणारे जनहिताचे निर्णय घेणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी पासून हिंदू सणांवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
    

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पुजाताaई भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, युवती सेना अध्यक्षा नम्रता भोसले, उपशहरप्रमुख योगेश चौगले, रुपेश इंगवले, कपिल सरनाईक, सचिन राऊत, युवासेनेचे पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, मंदार पाटील, शुभम शिंदे आदी शिवसेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा : श्री.राजेश क्षीरसागर शिवाजी पेठ "रायगड" शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन