बातम्या

वाढदिवसाचं औक्षण केलं अन् सेलिब्रेशन न करता थेट घटनास्थळी पोहचून आग आणली आटोक्यात

Celebrated the birthday and brought the fire under control by reaching the spot directly without celebrating


By nisha patil - 7/29/2023 5:23:03 PM
Share This News:



अग्निशमन दलाचे जवान अनेकांसाठी  देवदूत ठरतात. त्यांची तत्परतादेखील आपण पाहिली आहे. अशाच पुण्यातील अग्निशमन दलाच्या एका जवानाने आपला वाढदिवस सेलिब्रेट न करता घटनास्थळी हजेरी लावली आणि त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात यायला मोठी मदत झाली. कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान दशरथ माळवदकर असं या जवानाचं नाव आहे. त्यांच्या या कामाचं सध्या चांगलंच कौतुक होत आहे. कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान दशरथ माळवदकर यांचा आज 54 वा वाढदिवस होता. ते अग्निशमन दलात गेली 22 वर्षे सेवा बजावत आहेत. ते आज सकाळी ऑफिसला निघत असताना कुटूंबीयांनी त्यांचं औक्षण केलं आणि कामावर जाताना सुट्टी घेण्याचा आग्रह केला. त्यांनी "कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर" असं म्हणत ते ड्युटीकरता घराबाहेर पडले. कारण त्यांना कोंढवा येथील आगीची घटना कळाली होती आणि आपण सुट्टी न घेता आगीच्या वर्दीवर जाणं हे त्यांनी गरजेचे समजून तत्परतेने ड्युटीवर जाऊन आपले कर्तव्य बजावले. घटनास्थळी असलेले अग्निशमन अधिकारी समीर शेख, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे, कैलास शिंदे व इतर जवानांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. अग्निशमन दलाचे जवान  नेहमीच आपल्या कर्तव्याला महत्व देत कामगिरी चोख बजावतात.

पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक  झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात  रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.


वाढदिवसाचं औक्षण केलं अन् सेलिब्रेशन न करता थेट घटनास्थळी पोहचून आग आणली आटोक्यात