बातम्या
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचा ६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!
By nisha patil - 7/2/2025 7:39:27 PM
Share This News:
इचलकरंजीतील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा ६२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरीताई आवाडे, बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशालीताई आवाडे, आदित्य आवाडे आणि दिया आवाडे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन संजय अगिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, संचालक सुभाष जाधव, बंडोपंत लाड, महेश सातपुते, बाबुराव पाटील, बाळकृष्ण पोवळे, श्रीशैले कित्तुरे, शैलेश गोरे, रमेश पाटील, बँकेचे सीईओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील, शाखाधिकारी लक्ष्मण कोळेकर, राजेंद्र बचाटे यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचा ६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!
|