बातम्या

गोकुळ’ मार्फत महाराष्ट्र कृषी दिन साजरा...

Celebrating Maharashtra Agriculture Day through Gokul


By nisha patil - 2/7/2024 1:25:25 PM
Share This News:



 महाराष्ट्र राज्याच्या हरीत क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचा स्मृतीदिन व महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथील आवारात वृक्षारोपन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

यावेळी संघाचे ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते संघाच्या प्रांगणात औषधी  गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांनी गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.पी.जे.साळुंखे, सिव्हील व्यवस्थापक प्रकाश आडनाईक, डॉ.प्रकाश दळवी, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. तानाजी कडवेकर, डॉ. सुभाष गोरे, डॉ. विजय मगरे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


गोकुळ’ मार्फत महाराष्ट्र कृषी दिन साजरा...