बातम्या
साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचे कठोर पाऊल
By nisha patil - 8/12/2023 3:30:21 PM
Share This News:
साखरेचे उत्पादन, विक्री व साठा नियंत्रण करण्यासाठी व साखर योग्यरीत्या उपलब्ध करण्यासाठी सरकारने उसाच्या रसापासून तसेच सिरपपासून इथेनॉल तयार करण्यास गुरुवारी बंदी घातली आहे हा निर्णय घेऊन कठोर पाऊल उचलले असून, यामुळे स्थानिक बाजारातील साखरेच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाने हे आदेश काढले. त्याचप्रमाणे पेट्रोलियम कंपन्यांनाही तसे कळविण्यात आले आहे.देशात यंदा उसाची मोठी टंचाई भासत आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होणार असून साखर उत्पादन घटल्यास बाजारातील साखरेचे दर वाढणार आहेत. जागतिक साखर उत्पादनात सुमारे 35 लाख टनाची घट येण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतात सुमारे 300 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.मात्र, मळीपासून इथेनॉल निर्मितीस असलेली मुभा कायम ठेवण्यात आली आहे. सर्व साखर कारखान्यांना आदेश देण्यात आले आहेत.
साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचे कठोर पाऊल
|