बातम्या
केंद्र सरकारची लडाख मध्ये नवीन पाच जिल्हे निर्माण करण्याची घोषणा...
By nisha patil - 8/26/2024 3:31:04 PM
Share This News:
केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या X खात्यावर लिहिले की, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ लोकांना देणे सोपे होणार आहे. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यापूर्वी लडाखसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण केले आहेत.
केंद्र सरकारची लडाख मध्ये नवीन पाच जिल्हे निर्माण करण्याची घोषणा...
|