बातम्या

जिल्हा परिषदमध्ये छ. शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Ch in Zilla Parishad Shivaji Maharaj


By nisha patil - 2/19/2024 9:10:11 PM
Share This News:



जिल्हा परिषदमध्ये छ. शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) आजच्या प्रसंगातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रातील काही घटनांचा अभ्यास उपयोगी पडेल असा विश्वास शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
     

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.   याप्रसंगी जिल्हा परिषद कलामंच यांचेवतीने राज्यगीत गायन करणेत आले. त्यानंतर जिल्हा परिषद सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणेत्त आले होते . 
   

सुतार यांनी सदर व्याख्यानात शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून रयतेच्या मनातील अंधश्रध्दा दूर केल्याचे उदाहरण दिले. राजाराम महाराज ज्यावेळी पालथे जन्माला आले तेव्हा शुभ अशुभ अशी चर्चा होऊ लागली तेव्हा शिवाजी महाराजांनी ही बाब अशुभ नसून हे बाळ दिल्लीचे तख्त पालथे करणार आहे असे शिवाजी महाराजांनी ठासून सांगीतले व अंधश्रध्देचे कृतीद्वारे निर्मुलन केले. 

 शिवाजी महाराजांच्या चरित्र वाचून त्यामधील आग-याच्या सुटकेचे उदाहरण अंगीकारून त्याचा उपयोग डॉ. सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्रयलढयासाठी केला.  यावेळी सुतार यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांची दुरदृष्टी व त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे व त्यांचे चरित्र नव्याने अभ्यासण्याची गरज आहे असे सांगितले.
             

यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी या जयंतीच्या निमित्ताने व्हिएतनाम या छोटया देशाने अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राशी यशस्वी झुंज दिली व व्हिएतनाम या देशाच्या प्रमुखांने शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले होते त्यामुळे आम्ही अमेरिकेसोबत यशस्वी झुंज दिली असे मुलाखतीदरम्यान सांगीतलेचे उदाहरण या प्रसंगी सांगीतले. 
   

त्यानंतर सुषमा पाटील यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यांचे जयंतीस मोठया संख्येने उपस्थित राहीलेबददल आभार व्यक्त केले. याप्रसंगी  सुषमा देसाई ,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.ए. बारटक्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर  हे उपस्थित होते.


जिल्हा परिषदमध्ये छ. शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी