राजकीय

"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्यांचा निराकरण! राहुल आवाडे

Chai Pe Charcha Direct interaction with citizens


By nisha patil - 11/14/2024 6:08:37 PM
Share This News:



"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्यांचा निराकरण!

इचलकरंजीतील स्वामी विवेकानंद कॉलनी परिसरात महायुतीचे अधिकृत उमेदवार, मा. श्री. राहुल प्रकाश आवाडे यांनी 'चाय पे चर्चा' या उपक्रमाद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि भावना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

या चर्चेमध्ये नवीन दृष्टिकोन आणि प्रभावी उपायांची शोध घेण्याची प्रेरणा मिळाली. नागरिकांशी संवाद साधताना, त्यांच्यापासून मिळालेल्या सूचनांनी आगामी कार्यांच्या दिशा निश्चित करण्यात मदत केली. यामुळे उमेदवारांना नवी ऊर्जा मिळाली असून, उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात स्वामी विवेकानंद कॉलनीच्या ज्येष्ठ नागरिकांपासून युवकांपर्यंत सर्व वर्गांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.


"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्यांचा निराकरण! राहुल आवडे