राजकीय
"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्यांचे समाधान!
By nisha patil - 11/14/2024 5:42:42 PM
Share This News:
"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्यांचे समाधान!
इचलकरंजी येथील ढोर गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरात आमदार मा. श्री. प्रकाशआण्णा आवाडे यांनी 'चाय पे चर्चा' या उपक्रमाद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह समस्यांची सोडवणूक करण्याचे मार्ग शोधले गेले. नागरिकांशी थेट संवाद साधताना, समाजाच्या गरजा आणि अपेक्षांबाबत अधिक स्पष्ट समज प्राप्त झाला, ज्यामुळे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली.
आजपर्यंत केलेल्या कामांबद्दल नागरिकांचे मत व प्रतिक्रिया घेतल्यामुळे आगामी कार्यांवर मार्गदर्शन मिळाले. नागरिकांच्या विश्वासाने उमेदवारांना नवी ऊर्जा मिळाली असून, उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, प्रकाश पाटील, गुंडू गोरे, विजय जाधव, निळकंठ कटके, शशिकांत चौधरी, किरण शेरखाने, चंद्रकांत कदम यांच्यासह ढोर गल्ली आणि विठ्ठल मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक व बूथ प्रमुख उपस्थित होते.
"चाय पे चर्चा" – नागरिकांशी थेट संवाद, समस्यांचे समाधान!
|