बातम्या

नरंदे येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण

Chain hunger strike for Maratha reservation at Narande


By nisha patil - 2/11/2023 6:32:46 PM
Share This News:



  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातून बऱ्याच ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे. सकल मराठा  समाज नरंदे यांच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज  जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे 

गेले कित्येक दिवस मराठा आरक्षणासाठी सारा समाज रस्त्यावर उतरला यालाच पाठिंबा देण्यासाठी  हातकणंगले तालुक्यातील   नरंदे येथे सोमवार पासून साखळी उपोषनास सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन  गावातील मान्यवरांच्या हस्ते करून या उपोषणास सुरुवात झाली यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद  ठेवून व्यापारी असोसिएशनच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी गावातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सायंकाळी संपूर्ण गावातून शांतता रॅली काढण्यात आली आणि  आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला


नरंदे येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण