बातम्या
गणेशोत्सव कालावधीत चाकरनाम्याना महामार्ग टोल फ्री
By nisha patil - 9/16/2023 7:39:48 PM
Share This News:
यंदा गणपती सणासाठी पुण्या मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरनाम्याच्या वाहनांना टोल माफी करण्यात आली आहे महामार्गावरील विविध टोल नाक्यावर सुमारे दहा हजाराहून अधिक वाहनांना टोल सवलतींचा फायदा मिळणार आहे ही सवलत आजपासून 16 सप्टेंबर ते एक आक्टोंबर या कालावधीत असणार आहे
कोकणात पुणे व कोल्हापूर मार्ग जाणाऱ्या गणेश भक्तांच्या कार जीप यांसारख्या वाहनांना जाताना व गणेश विसर्जनानंतर परतणाऱ्या वाहनांना टोलमापी करण्याचा निर्णय घेतला आहे ही सवलत एसटी बसेस नाही लागू होण्याची शक्यता आहे मुंबई पुणे गती मार्ग तसेच कोल्हापूर मार्ग कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने महामार्गावरील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे कोकणात जाणाऱ्या वाहनांना गणेशोत्सव कोकण दर्शन या नावाचे स्टिकर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे यापूर्वी टोल सवलतींचा हा कालावधी गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि गणेशोत्सवा नंतर येताना म्हणजे 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत लागू केल्याची घोषणा करण्यात आली आहे यासाठी स्थानिक पोलीस ठाणे व प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची नोंदणी करून त्यांच्याकडून मानावर लावण्यासाठी स्टिकर घ्यावे लागणार आहेत
गणेशोत्सव कालावधीत चाकरनाम्याना महामार्ग टोल फ्री
|