बातम्या

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता,

Chance of heavy rain in the state


By nisha patil - 6/29/2023 12:56:15 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस  सुरु आहे. या पावसामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडे पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळं राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईतही जोरदर पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे. 


राज्यात मुसळधार पावसाची शक्यता,