बातम्या
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By nisha patil - 6/11/2023 1:31:18 PM
Share This News:
राज्यासह देशभरात गारठा वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असला तरी सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी जाणवत आहे.अशातच कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने माहिती दिली आहे.
राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस पारा खाली जाताना दिसत आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेतानाही पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात गारठा वाढत चालला आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असला तरी सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी जाणवत आहे. दरम्यान, राज्यासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.. राज्यात काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
|