बातम्या

राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत

Chances of Raju Shetty Mavia friendship end


By nisha patil - 4/4/2024 12:37:40 PM
Share This News:



 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, मविआचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी. सी. पाटील अशी लढत तेथे होणार आहे. 
 

शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याचे अनेक प्रयत्न झाले पण दोन्ही बाजूंनी काही अटी, शर्ती होत्या, त्यावर चर्चाही झाली पण एकमत न झाल्याने शेवटी चौरंगी लढतीचे चित्र आता समोर आले आहे. शेट्टी यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. मविआने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, अशी विनंती शेट्टी यांनी ठाकरेंना केली होती.


राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत