बातम्या
चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा बीजेपीला बिनशर्थ पाठिंबा
By nisha patil - 11/25/2024 7:33:27 PM
Share This News:
चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा बीजेपीला बिनशर्थ पाठिंबा
चंदगड विधानसभेचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टी व महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. आज त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली.यावेळी पाठिंब्याचे पत्र फडणवीस यांच्याकडे दिलं.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला व कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर टाकली.
यावेळी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर उपस्थित होते.
चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा बीजेपीला बिनशर्थ पाठिंबा
|