बातम्या
चंद्राबाबू नायडू सपत्नीक कोल्हापूरात
By nisha patil - 5/16/2024 5:29:10 PM
Share This News:
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत देशाचा मूड अत्यंत चांगला आहे. एनडीएसाठी देशात चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. एनडीएला 400 हून अधिक जागांवर यश मिळवेल, असा विश्वास आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन देशासाठी प्रार्थना केली.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांनी सपत्नीक श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या पत्नीसोबत तब्बल अर्धा तास करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा केली. यावेळी श्री अंबाबाई मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान देवीच्या दर्शनानंतर चंद्रबाबू नायडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना, आज महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन खूप आनंद झाला, देशामध्ये शांती नांदावी, या देशातील सर्वांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना ही महालक्ष्मीच्या चरणी केली असल्याची प्रतिक्रिया चंद्रबाबू नायडू यांनी दिली.
तसेच यावेळी आंध्र प्रदेश मधील राजकारणाविषयी विचारले असता, त्यांनी यावर काहीही बोलणार नाही असे प्रतिक्रिया दिली. मात्र सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत देशाचा मूड अतिशय चांगला आहे. एनडीएसाठी देशात अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे एनडीएला 400 हून अधिक जागा मिळणार असा विश्वास यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे.
चंद्राबाबू नायडू सपत्नीक कोल्हापूरात
|