बातम्या
करवीरमध्ये विजयाचा उन्माद: चंद्रदीप नरके समर्थकांचा काकांवरच जुलूम
By nisha patil - 11/28/2024 7:43:53 PM
Share This News:
करवीरमध्ये विजयाचा उन्माद: चंद्रदीप नरके समर्थकांचा काकांवरच जुलूम
करवीर विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके यांचा विजय साजरा करताना त्यांचे समर्थक आणि मुलाने वादग्रस्त कृत्य केल्याची घटना उघड झाली आहे. अरुण नरके, ज्यांनी चंद्रदीप नरके यांच्या राजकीय प्रवासात मोलाचा हातभार लावला, त्यांच्याच घराबाहेर हा जल्लोष करण्यात आला.
निकालाच्या रात्री अरुण नरके यांच्या घराबाहेर फटाक्यांचा गोंधळ, गुलालाची उधळण, आणि गाड्यांवर नाचून नुकसान केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या उन्मादी कृत्यांमुळे अरुण नरके यांच्या घरासमोरील तुळस आणि इतर झाडेही जळून गेली.
चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा उन्माद त्यांच्या कार्यकर्त्यांनी थांबवण्याऐवजी त्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. अरुण नरके यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्याविरोधात हा राग असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे मतदारसंघात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
करवीरमध्ये विजयाचा उन्माद: चंद्रदीप नरके समर्थकांचा काकांवरच जुलूम
|