बातम्या
चंद्रकांत दादा पाटील हा विजलेला दिवा अनिल घाटगे
By nisha patil - 3/19/2024 5:11:00 PM
Share This News:
शरद पवार यांचा हिशोब चुकता करण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपली राजकीय कुवत, उंची, योग्यता, तपासून पहावी 2014 रोजी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाच खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपदे होती. त्यावेळी आपण महाराष्ट्रासाठी काय केले हे कंदील घेऊन शोधण्याची वेळ भाजप कार्यकर्त्यांच्या वर आली त्यामुळे तुम्हाला परवा अक्षरशा गयावया करून मंत्रीपद मागण्याची वेळ आली भाजपचे दोन नंबरचे मंत्री असा दबदबा असणारे दादा यांची अवस्था घायाळ नसलेल्या सिंहासारखी झाली आहे. आणि हा शरद पवारांचा हिशोब करायला निघाला आहे हा 2024 चा सर्वात मोठा जोक असेल.
60 वर्ष राजकारणात ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता. महाराष्ट्राला देशाच्या राजकारणात कायम पणाने अग्रेसर ठेवणारे आणि *महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीश्वरांसमोर कधीही घाण न ठेवता दोन हात करण्याची ताकद बाळगणाऱ्या. पवार साहेबांच्या वर त्यांच्या पुतण्याला फोडून *"की ज्या पुतण्याने तुम्हाला तुमच्या नावातला दादा हा शब्द काढून चंपा ही उपाधी दिली.त्यांच्या वळचणीला तुम्हाला जावं लागले हा नुसता तुमचा पराभव नसून अख्ख्या भाजपचा आहे हे लक्षात ठेवा.
2019 ला आपले नेते अमित शहा यांनी बंद खोली अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. तो न पाळल्यामुळे आणि आपल्या कुठ नीतीच्या शिफारशीमुळे महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लागली. ही नामुष्की टाळण्यासाठी नंतर शरद पवार महाविकास आघाडी स्थापन केली हा इतिहास सर्वश्रुत आहे.
सर्व माहीत असताना देखील आपण उचलली जीभ लावली टाळ्याला याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या वाचाळवाणीने आपले हसे करून घेत आहात.आपणास भाजपने बोलायला बंदी घातली आहे हे उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. असो आपली अवस्था भारतीय जनता पार्टीने ना घर का ना घाट का अशी करून ठेवली आहे. ही सुद्धा शरद पवार नीच केली का अर्थात.महाराष्ट्रात काही जरी घडले तरी पवार ना जबाबदार धरण्याची एक नवीन रीत पडली आहे. आणि पवारांच्या वर बोलल्याशिवाय
तुमचे पेपर मध्ये नावच येत नाही त्याला तुम्ही तरी काय करणार
आपले बुरसटलेले विचार महाराष्ट्राला प्रेरणा देत राहतील आणि आपला फाजील आत्मविश्वास *पुन्हा एकदा हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही .आपण आपली चिंता करा पवार यांची चिंता करण्यासाठी महाराष्ट्राची जनता समर्थ आहे.
चंद्रकांत दादा पाटील हा विजलेला दिवा अनिल घाटगे
|