बातम्या

राम लल्लाच्या दर्शनाने चंद्रकांत पाटील झाले भावूक

Chandrakant Patil became emotional after seeing Ram Lalla


By nisha patil - 1/23/2024 4:40:48 PM
Share This News:



पुणे : अयोध्यातील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्य वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्री रामनामाने देशभरातील नागरिक जल्लोष करत असताना प्रभुशीरामाच्या प्रथमदर्शनाने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाऊ झाल्याचं पहायला मिळालं. श्री रामाच्या दर्शनाने जीवन सार्थक झाल्याच्या भावनिक उद्धार त्यांनी यावेळी काढले
 

  कोथरूड मधील मृत्युंजयेश्वर मंदिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेऊन आयोध्यातील प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम दृकश्राव्य माध्यमातून पाहिला. यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी अनिल व्यास देव देवेश्वर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत कोथरूड मंडळ अध्यक्ष डॉ .संदीप बुटाला भाजपचे सर्व पदाधिकारी आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

यावेळी मंत्री पाटील म्हणाले की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करीत असताना स्वर्गीय मदनदास देवांचे मार्गदर्शन आणि मोरोपंत जी पिंगळे यांच्या सूचनेनुसार श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनाशी जोडलो गेलो


राम लल्लाच्या दर्शनाने चंद्रकांत पाटील झाले भावूक