बातम्या

चंद्रकांत पाटील यांनी २०१९ ला आबिटकर वगळता सेनेच्या आम. पाडण्यासाठी आदेश दिला होता

Chandrakant Patil except Abitkar in 2019


By nisha patil - 4/26/2024 9:21:10 PM
Share This News:



कोल्हापूर - प्रतिनिधी  कोल्हापूर जिल्हातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक आर.डी. पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. गेले तीस वर्ष ते प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत होते. प्रामाणिकपणे काम करूनही वेळोवळी पद न देता डावलण्यात आल्यानं पक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज ते पत्रकार बैठकीत बोलत होते.

यावेळी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व उमेदवार पाडण्याचे आदेश दिले होते असा गौप्यस्फोट माजी नगरसेवक आर.डी. पाटील यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी दहा मतदारसंघातून कुठंही उभं राहावं, त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीनं आपल्याला उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करू असं आव्हान दिलं. छत्रपती शाहू महाराजांचे आपल्या सगळ्यावरती अमाप उपकार आहेत, त्यामुळं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.


चंद्रकांत पाटील यांनी २०१९ ला आबिटकर वगळता सेनेच्या आम. पाडण्यासाठी आदेश दिला होता