बातम्या
नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या व माघार घेण्याच्या दि.12 ते 22 एप्रिल या कालावधीत वाहतूक मार्गात बदल
By nisha patil - 11/4/2024 3:34:28 PM
Share This News:
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च, 2024 रोजी घोषित केला असून आदर्श आचारसंहीता दिनांक 16 मार्च 2024 पासुन कोल्हापूर जिल्हयात लागू करण्यात आलेली आहे. दिनांक 12 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवार नामनिर्देशन फॉर्म भरणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात नागरीकांची गैरसोय होवू नये, वाहतुकीची कोंडी होवू नये. सामान्य जनतेस नियमित व्यवहार पार पाडण्यास अडसर निर्माण होवू नये याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील दिनांक 12 ते 22 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते फॉर्म भरण्याची वेळ संपेपर्यंत तसेच दिनांक 22 एप्रिल रोजीचे माघार घेण्याची वेळ संपेपर्यंत वाहतूक खालील प्रमाणे तात्पुरती बंद व पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी कळविले आहे.
अ) मोटार वाहतुकीसाठी प्रवेश बंद केलेला तसेच पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे- असेंम्बली कॉर्नर ते कलेक्टर ऑफिस चौक जाणारे वाहतुकीस उद्योग भवन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहतूक डावीकडे वळून महावीर गार्डन ते जयंती नाला या मार्गाने पुढे मार्गस्थ होईल. आदित्य कॉर्नर ते कलेक्टर ऑफिस चौक जाणारे वाहतूक कनाननगर कॉर्नर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहतुक कनाननगर, उमेदपुरी मार्गे पुढे मार्गस्थ होईल. महावीर कॉलेज ते उद्योग भवन ते बसंत बहार ते असेंम्बंली रोडने जाणारे वाहतुकीस कलेक्टर ऑफिस चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून सदरची वाहतुक खानविलकर पेट्रोलपंप मार्गे पुढे मार्गस्थ होईल.
पार्कीग बाबत - नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी आलेल्या उमेदवार त्यांच्या कार्यकत्यांनी आपली वाहने १०० फुटी रोड व इ.पी. स्कुल ग्राउंडवर खुल्या जागेत, पार्क करावीत
नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या व माघार घेण्याच्या दि.12 ते 22 एप्रिल या कालावधीत वाहतूक मार्गात बदल
|