बातम्या

रोज फक्त ५ मिनिटे करा ‘ओम’ चे उच्चारण, होतील ‘हे’ ११ जबरदस्त फायदे

Chant Om for just 5 minutes daily


By nisha patil - 3/23/2024 10:01:18 AM
Share This News:



ओम या मंत्राचे उच्चारण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात, हे संशोधनातून समोर आले आहे. हे उच्चारण करण्यासाठी कोणत्याही स्थितीत बसून डोळे बंद करुन दिर्घश्वास घ्यावा. नंतर ओम उच्चारण करत हळुहळू श्वास सोडावा. या काळात पूर्ण शरीरात व्हायब्रेशन होते. यावेळी कान बंद करता आले तर आणखी फायदा होतो.

होतील हे फायदे

१ झोप
झोपण्यापूर्वी ओम उच्चारण केल्याने चांगली झोप लागते. झोप न लागण्याचा त्रास दूर होतो.

२ ओम
उच्चारणामुळे मेंदूपर्यंत कंपने पोहचतात. यामुळे एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.

३ कणा
यामुळे निर्माण होत असलेल्या कंपनांमुळे पाठीचा मणका मजबूत होतो.

४ निरोगी हृदय
ओम उच्चारण केल्याने फुफ्फुस, रक्तदाब, रक्ताभिसरण नियंत्रित होते. यामुळे हृदय निरोगी होते.

५ डायजेशन
ओम उच्चारण केल्याने पोटामध्ये जे कंपन होते, त्यामुळे डायजेशन चांगल्याप्रकारे होते.

६ उर्जा वाढते
ओम उच्चारणामुळे शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो. तसेच रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते.

७ थकवा
थकवा दूर होतो. फ्रेश वाटते.

८ थॉयराईड
ओम उच्चारण केल्याने निर्माण होत असलेल्या कंपनांमुळे थॉयराईडपासून बचाव होतो.

९ एंग्जायटी
ओम उच्चारण केल्याने एंग्जायटी, अस्वस्थपणा यासारख्या समस्या दूर होतात.

१० तणाव
ओम उच्चारण केल्याने मानसिक ताण, ताणाव दूर होतो.

११ रक्ताभिसरण
यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.


रोज फक्त ५ मिनिटे करा ‘ओम’ चे उच्चारण, होतील ‘हे’ ११ जबरदस्त फायदे