बातम्या

जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत

Chanting Jai Malhar in Jejuri in the palanquin of Saint Dnyaneshwar Maharaj


By nisha patil - 6/16/2023 7:38:22 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत स्वागत करण्यात आलं. जेजुरीकरांनी पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली. दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने जेजुरीकर पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. तर संत तुकाराम महाराजांची पालखीने यवतकरांना निरोप देत वरवंड येथे दाखल झाली आहे. यावेळी वारकऱ्यांनी अभंग आणि भजनाचं गजर करत यवत ते वरवंड प्रवास केला. संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंड येथे मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आज जेजुरीत मुक्काम असणार आहे.


जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत