बातम्या
जिल्हास्तरीय स्पर्धेत चौगुले महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला
By nisha patil - 6/3/2024 9:50:28 PM
Share This News:
जिल्हास्तरीय स्पर्धेत चौगुले महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला
पन्हाळा - प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय तृतीय क्रमांक देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये एकूण २८ परीक्षांची तयारी करून घेतली जाते त्या परीक्षांचे मार्गदर्शन हे आय.ए.एस.,आय.पी.एस., आय.एफ.एस. असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने केले जाते तसेच ५० कौशल्य विकास कोर्सचे मार्गदर्शन ही वेगवेगळ्या उद्योजक यांच्यामार्फत केले जाते.आय.ए.एस.आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला यातून कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शासकीय अधिकारी व स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्यामार्फत मार्गदर्शन केले जाते यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन महाविद्यालयातून दिले जाते आपल्या करिअर बाबतचा प्लॅन ए व प्लॅन बी तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते तसेच महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन विद्यार्थ्यांना व्याख्यानाच्या माध्यमातून व त्यांना पुस्तकांची सोय उपलब्ध करून दिली जाते. तसेच अभ्यासिकाही उपलब्ध करून दिली जाते.
या उपक्रमासाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले,संस्था सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ.बी. एन.रावण,ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस. एस.कुरलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत चौगुले महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला
|