बातम्या
'प्राधिकरणाचे' सीईओ चव्हाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धरले धारेवर...
By nisha patil - 10/1/2025 3:44:32 PM
Share This News:
प्राधिकरणाचे' सीईओ चव्हाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धरले धारेवर...
कारभारात सुधारणा करा जिल्हाधिकाऱ्यांच्या चव्हाण यांना सूचना
जिल्हाधिकारी येडगेंनी प्राधिकरणाच्या कार्यालयास भेट दिली व कोल्हापूरातील प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाणांना दिरंगाईच्या कामकाजप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी चांगलेच धारेवर धरले. तुमच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रचंड तक्रारी आहेत, कारभारात सुधारणा करा अशा सक्त सूचना त्यांनी चव्हाण यांना दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी उशिरा येत असल्याची कंबुली त्यांना दिलीय.
कोल्हापूरातील प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाणांना दिरंगाईच्या कामकाजप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी चांगलेच धारेवर धरले. तुमच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रचंड तक्रारी आहेत, प्रलंबित प्रकरणाचा निपटारा तत्काळ करा, कारभारात सुधारणा करा अशा सक्त सूचना त्यांनी चव्हाण यांना दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी उशिरा येत असल्याची देखील कबुली अमोल येडगेंना दिली. ते मोबाइल उचलत नाहीत. बंद ठेवतात, अशा तक्रारी केल्या. प्राधिकरणाच्या कार्यालयात सीईओ संजयकुमार चव्हाण यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चांगलेच झापलं. तसेच फायलींच्या ढिगाऱ्याचीही पाहणी केली. जिल्हाधिकारी येडगे यांनी रोज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटाला कार्यालयात यावे. वेळचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी बायोमेट्रीक बसवावे असेही स्पष्ट केले. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी येडगे यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयास भेट दिली.
'प्राधिकरणाचे' सीईओ चव्हाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धरले धारेवर...
|