बातम्या

राष्ट्रीय सहकार धोरण अभ्यास समितीवर कोल्हापूरचे चेतन नरके

Chetan Narake of Kolhapur on the National Cooperative Policy Study Committee


By nisha patil - 12/30/2023 3:31:03 PM
Share This News:



राष्ट्रीय सहकार धोरण अभ्यास समितीवर कोल्हापूरचे चेतन नरके

राष्ट्रीय सहकार धोरण - २०२३ मधील शिफारशींचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने नवीन धोरण आखण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर 'गोकुळ' दूध संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या समितीमध्ये सहकार आयुक्तांसह सहकार विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सहकारातून समृद्धी ही संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण-२०२३ तयार करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या सहकार धोरणात अनुषंगिक बदल करण्याच्या दृष्टीने राज्यातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून राज्याचे सहकाराचे नवीन धोरणाबाबत अहवाल सादर करणार आहे. या समितीवर डॉ.चेतन नरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राष्ट्रीय सहकार धोरण अभ्यास समितीवर कोल्हापूरचे चेतन नरके