बातम्या

तुम्ही"निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका"

Chhagan Bhujbal criticizes Sharad Pawar


By nisha patil - 8/1/2024 3:25:55 PM
Share This News:



तुम्ही"निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका"

"आम्ही इथे येण्यासाठी तुम्हीच परिस्थिती निर्माण केली होती, तुम्ही आमदारांच्या सहावेळा सह्या घेतल्या. सर्वांसमोर हे असं करायचं आहे म्हणून चर्चा केली. पण, ऐनवेळेला तुम्ही हो म्हणायचं आणि माग सरायचं. आम्ही इथे येण्यासाठी तुम्ही परिस्थिती निर्माण केली, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर केली.  काल ठाण्यात राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा मेळावा झाला. यावेळी बोलताना भुजबळ यांनी शरद पवारांवर आरोप करत टीका केली. 

"आपल्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे, पक्षातील सगळ्यांनी एकमेकांना मदत करा. आपआपसात पाय खेचण्याचे काम होऊ नये. आम्ही आमची विचारधारा बदलली नाही. विचारधारा तिच शाहू, फुले आंबडकरांची आहे, अजितदादा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत आहेत, असंही भुजबळ म्हणाले. आपला पक्ष तोच आहे, ध्येय तेच आहे, लोक म्हणतील हा पक्ष नवीन आहे पण आपला पक्ष तोच जुना आहे. 

"राष्ट्रवादी पक्षासाठी प्रफुल्ल पटेल यांनीही कष्ट घेतले आहेत, त्यामुळे पक्ष आपल्यासोबतच राहणार आहे. निकाल आपल्या बाजूनेच लागेल. मुंबईत आपल्या पक्षाचा एक तरी खासदार झाला पाहिजे, आपण आता आपला खासदार निवडून आणणार आहोत. यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपण काम करतोय हे लोकांना कळलं पाहिजे. लहान लहान काम आपण केली पाहिजे, लोकांना आपलंस केले पाहिजे, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.   

छगन भुजबळ म्हणाले, पलिकडच्या गटातील लोक ज्यावेळी संतापतील त्यावेळी समजून घ्या आपल्या सगळ्यांची शक्ती वाढत आहे. म्हणून ते आपल्यावर टीका करत आहेत. येऊन जाऊन सारख अजित पवार, छगन भुजबळ विसरा आता आम्हाला तुम्ही. नवीन तुमच तुम्ही काम उभं
 आम्ही आमच काम उभं करतो, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. आम्ही एका परिस्थितीमुळे इकडे आलो, ती परिस्थिती तुम्हीच निर्माण केली. तुम्ही आमदारांच्या सहावेळा सह्या घेतल्या. सर्वांसमोर हे असं करायचं आहे म्हणून चर्चा केली. पण, ऐनवेळेला तुम्ही हो म्हणायचं आणि माग सरायचं. सारख तळ्यात, मळ्यात करायचं. मग आम्ही एकदा ठरवलं जायचं. आम्ही आमची शक्ती वाढवणार, ती आहे, मागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादांना मोठं यश मिळालं आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. 


तुम्ही"निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका"