बातम्या
छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी - छत्रपती संभाजीराजे
By nisha patil - 11/17/2023 7:45:47 PM
Share This News:
ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा आज पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जहरी टीका केली. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असे भूजबळ जरांगे पाटलांना उद्देशून म्हणाले. "आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर वर पोस्ट पोस्ट करत "छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम कर आहेत" असा आरोप केला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ म्हणाले, 'शरद पवारांना ओबीसींना आरक्षण दिलं. आता मराठा समाजाचे नवे देव झालेत. दगडाला शेंदूर फासून देव कुठे झाला? यावेळी त्यांनी नाव न घेता जरांगे- पाटलांवर निशाणा साधला. कुणाचं खाताय, कुणाचं खाताय? की तुझं खातोय का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी भाकरी तोडत नाही. असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. आमची लेकरं बाळ आमची लेकरंबाळ ही दोनचं वाक्य येतात. का आमची लेकर बाळं नाहीत का? आजवर मराठा नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. अरे मराठा तरुणांनो, याच्या मागे कुठे लागलात ?' ओबासी आरक्षाणाचा आदेश केंद्राने दिला, शरद पवार यांनी तो मान्य केला. मराठा समाज अवैधपणे ओबीसी आरक्षणात शिरतोय. आरक्षण म्हणजे काय हे तर आधी समजून घ्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.असे ते म्हणाले
यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली ते म्हणाले "छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम कर आहेत" सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी. असे ते म्हणाले
छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी - छत्रपती संभाजीराजे
|