बातम्या

विधानसभा जागावाटपाच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा यू टर्न

Chhagan Bhujbals U turn on Assembly seat allocation statement


By nisha patil - 5/28/2024 7:55:37 PM
Share This News:



राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना परखड भूमिका मांडली होती. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे.  त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील. तसेच, इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू, असे उत्तर दिल्याने लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबत सुरु असल्याचे दिसून आले. आता यावर छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 
 

छगन भुजबळ म्हणाले की, राजकीय वाद करणे योग्य नाही. माझ्या पक्षाची बैठक सुरू होती. त्यामध्ये आम्ही काय बोलावं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही महायुतीमध्ये येणार होतो. त्यावेळी आम्हाला खासदारकी आणि आमदारकीच्या जागा सांगितल्या होत्या. त्यावेळी जी चर्चा झाली त्याची आठवण मी करून दिली आणि त्याची काळजी घ्या असं मी सांगितलं. बाकी काही नाही.


विधानसभा जागावाटपाच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा यू टर्न