बातम्या
छत्रपती संभाजीनगर पोलीस आता दबंग मोडवर
By nisha patil - 1/11/2023 4:31:51 PM
Share This News:
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील 32 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे, या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे
मागील काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला आता काही ठिकाणी हिंसक वळण पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे आता बघ्याची भूमिका न घेता हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांकडून पोलिसांना मिळाले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील 32 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी आणि रास्ता रोको केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर पोलीस आता दबंग मोडवर
|