शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
By nisha patil - 2/19/2025 11:03:17 AM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
कोल्हापूर दि. 19 : विवेकानंद कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्य् संस्थापक व संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ.एस.आर.कटृटीमनी यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, जातीधर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणूसकीने जगायला शिकवणारे राज्य् म्हणजे शिवरायांचे स्वराज्य्. शिवाजी महाराज हे मानवी मूल्ये जोपासणारे प्रगल्भ् विचारांचे तत्ववेता राजे होते. ते समतावादी होते . मानवी मूल्यांसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. लोककल्याणकारी शासनव्यवस्था हे त्यांचे अंतिम ध्येय होते. त्यांच्या निस्पृह, निष्कलंक चारितत्र्याने बांधलेली नैतिकता स्वराज बांधणीचा मजबूत पाया घालून गेले. ज्यावर आज आपण संपन्न् आणि समृध्द् शाश्वत जीवन जगत आहोत असे मत त्यांनी मांडले.
यावेळी इतिहास विभागाची बी.ए. भाग 1 ची विद्यार्थिनी कु. ऋतुजा शिंदे हिने अत्यंत जोशपूर्ण असे शिवरायांविषयी आपले विचार व्य्क्त् केले व शिवराजनीती जाणून घेण्यासाठी जाणत्या राजाचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत मांडले.
प्रा. डॉ. कविता तिवडे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रा. एस. पी. थोरात, प्राप्रा.एस.एस.कुंडले, डॉ.विकास जाधव, प्रा.एस. एस. थोरात, प्रा एम आर नवले, प्रा एस एस अंकुशराव, डॉ डी आर तुपे, . एन.सी.सी. प्रमुख कॅप्ट्न सुनिता भोसले, प्रा ए आर धस, प्रा.तिजईकर, प्रा के जे गुजर, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. आर. बी. जोग, श्री रवी चौगुले, श्री सदानंद दुर्गुळे यांच्यासह महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
|