बातम्या
पुन्हा स्वदेशात येणार छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख
By nisha patil - 9/9/2023 7:50:12 PM
Share This News:
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे 16 नोव्हेंबर रोजी आपल्या मायभूमीत परतणार. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ही सध्या लंडनमधील वस्तुसंग्रहालयात असून ती महाराष्ट्रात परत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत . मात्र आता शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच भारतात परतणार आहेत. ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली
या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर मनुगंटीवार म्हणाले की, ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे . आता ती वाघनख लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात आहेत, सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या 16 नोव्हेंबर रोजी वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.
पुन्हा स्वदेशात येणार छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख
|