बातम्या
छाया कदम यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरव
By nisha patil - 2/22/2025 6:10:18 PM
Share This News:
छाया कदम यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरव
स्नो फ्लॉवरसाठी पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये खास पुरस्कार
छाया कदम या आघाडीच्या अभिनेत्री म्हणुन ओळखल्या जातात. मागच्या वर्षीपासून लागोपाठ पुरस्कार सोहळ्यात मानाचे पुरस्कार मिळालेत अशा अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम यांनी अजून एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. छाया कदम यांच्या स्नो फ्लॉवरसाठी त्यांना पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार मिळाला आहे. .छाया कदम यांच्या पुरस्कारांचा हा सिलसिला असाच सुरू असून येणाऱ्या काळात त्या अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग असणार असल्याचं समजतंय. कमालीच्या दमदार भूमिका छाया कदम यांनी आजवर साकारल्यात. या कामाची पोचपावती म्हणून हा अजून एक महत्त्वपूर्ण पुरस्कार त्यांनी पटकावलाय.
छाया कदम यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरव
|