बातम्या

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ३९ कोटी ६१ लाखाचे अंदाजपत्रक मंजूर- मुख्य कार्यकारी अधिकारी -संतोष पाटील

Chief Executive Officer  Santosh Patil


By nisha patil - 2/24/2024 4:02:49 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ३९ कोटी ६१ लाखाचे अंदाजपत्रक मंजूर- मुख्य कार्यकारी अधिकारी -संतोष पाटील
प्रतिनिधी  पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे सन २०२४-२५ चे ३९ कोटी ६१ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जुन्या बहुतांशी योजना कायम ठेवतानाच ई-ऑफिस, ई-सेवापुस्तक, आदर्श शाळा यासारख्या नावीन्यपूर्ण योजनांवर भर दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांनी हा अर्थसंकल्प यांना सादर केला. यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे, लेखाधिकारी दुर्गाली गायकवाड, लेखाधिकारी अनिकेत गावडे उपस्थित होते. यानंतर सर्वसाधारण सभेत संतोष पाटील यांनी हे अंदाजपत्रक मांडले आणि ते मंजूर करण्यात आले. यावेळी अजयकुमार माने, सुषमा देसाई, मनीषा देसाई, अरुण जाधव, सचिन सांगावकर, श्रीपाद बारटके, शिल्पा पाटील, माधुरी परीट, डॉ. एकनाथ आंबोकर, मीना शेंडकर, डॉ. प्रमोद बाबर, संभाजी पवार, अभयकुमार चव्हाण, डॉ. संजय रणवीर आदी विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील १७४ शाळा आदर्श बनवण्याची योजना आखण्यात आली असून, या शाळांमध्ये सर्व मूलभूत सुविधा, वाचनालय, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ५० लाख रुपयांची तर शिक्षक विद्यार्थी साहित्य संमेलनासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रशासनाचे कामकाज गतिमान करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली वापरण्यात येणार असून यासाठी जिल्हा परिषदेच्या मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या बक्षिसातून तरतूद करण्यात येणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना लवकर लाभ देण्यासाठी ई-सेवापुस्तक उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विभागनिहाय योजना आणि तरतूद

शिक्षण विभाग : एकूण तरतूद ३ कोटी ७ लाख

प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्च : १ कोटी ५० लाख
शाळांना भौतिक सोयीसुविधा : ५० लाख
जिल्हा परिषदेने नेमलेल्या प्राथमिक शिक्षकांचे मानधन : २० लाख
आदर्श शिक्षक पुरस्कार : २० लाख
बॅ. बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा : १४ लाख
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार : ४ लाख
बांधकाम विभाग – एकूण तरतूद ३ कोटी २ लाख

प्रयोगशाळा खर्च : ३३ लाख
रस्ते सुधारणा : ६० लाख
शिवराज्याभिषेक सोहळा समारंभ : ६ लाख
विविध स्मारकांची देखभाल : १० लाख
कृषी विभाग – एकूण तरतूद २ कोटी १२ लाख

राजर्षि शाहू महाराज सेंद्रिय शेती प्राेत्साहन योजना : २० लाख
हुमणी जैविक नियंत्रणासाठी : १० लाख
मधुमक्षिका पालन योजना : १० लाख
सुधारित औजारे, जलसिंचन साधने : ३५ लाख
पाचट कुट्टी, मल्चर मशीन : ३० लाख
पीव्हीसी/एचडीपीई पाईप : २० लाख
बायोगॅस बांधकामासाठी पूरक अर्थसाहाय्य : ५० लाख
पशुसंवर्धन विभाग – एकूण तरतूद १ कोटी ५१ लाख रुपये

पशुवैद्यकीय दवाखाने/निवासस्थाने दुरुस्ती, विद्युतीकरण : २५ लाख
जंतनाशके खरेदी, गोचिड गोमाशी निर्मूलन, श्वानदंश प्रतिबंधक लस : २० लाख
दूध उत्पादन वाढीसाठी उपाययोजना : ३० लाख
वंध्यत्व निवारण, क्षारमिश्रणे पुरवठा : ३० लाख
दवाखाना व प्रयोगशाळा बळकटीकरण : १५ लाख
समाजकल्याण विभाग – एकूण तरतूद ४ कोटी ८ लाख रुपये

मागासवर्गीय वस्तीत एलईडी दिवे : ९१ लाख
मागासवर्गीय महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी साहित्य : ५० लाख
मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी साहित्य : ५२ लाख
मागासवर्गीयांना शेती उपयोगी साहित्य : ५० लाख
मागासवर्गीयांना स्वयंरोजगार साधने व उपकरणे : ३५ लाख
मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सोयी सुविधा : ४९ लाख ५७ हजार
राजर्षि छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता कमवा व शिका योजना : ११ लाख
दिव्यांग कल्याण विभाग – एकूण तरतूद ७० लाख रुपये

दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य : २० लाख
दिव्यांगांच्या शाळांना शैक्षणिक साहित्य : १० लाख
दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने : १० लाख
महिला व बालकल्याण विभाग – एकूण तरतूद १ कोटी ६८ लाख रुपये

युवती, महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण : २५ लाख
७ वी ते १२ वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण : २० लाख
कुपोषित मुलांना अतिरिक्त आहार : १९ लाख
अंगणवाडी /बालवाडींना साहित्य पुरवठा : ५० लाख
५ वी ते १२ वीच्या मुलींना सायकल पुरवठा : १५ लाख
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग – एकूण तरतूद २ कोटी ६७ लाख रुपये

सायफन योजनेतील संरक्षक कुंड व पाणी वितरण : ४० लाख
विश्रामगृहे, दवाखाने व सार्वजनिक ठिकाणी विंधन विहिरी : ५ लाख
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा विकास आराखडा : २५ लाख
पाटबंधारे विभाग एकूण तरतूद ४० लाख रुपये
पाझर, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती व गाळ काढणे : ४० लाख

आरोग्य विभाग– एकूण तरतूद १ कोटी ३ लाख रूपये

वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती : ३० लाख
ग्राम आरोग्य / आशा संजीवनी कार्यक्रम : २० लाख
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, आयुर्वेदिक दवाखाने व प्राथमिक आरोग्य पथके यांना आवश्यकतेनुसार सर्प व श्वानदंश लसी, औषधे, साधनसामुग्री व उपकरणे खरेदीसाठी : ३० लाख
स्वच्छ सर्वांग सुंदर दवाखाना : ८ लाख
ग्रामपंचायत विभाग
राजर्षि छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत योजना : १९ लाख
यशवंत सरपंच पुरस्कार : १९ लाख

गणातील विकासकामांसाठी ६ कोटी रुपये

२० संकीर्ण मधून जिल्हा परिषद गणांमध्ये सर्वसमावेशक कामे करण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यातर सदस्यांसाठी म्हणून हा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या निवडणुका कधी होणार आणि हा निधी सदस्यांना खर्च करण्यासाठी कधी मिळणार असा प्रश्नच असून निवडणुका वेळेत झाल्या नाहीत तर हा निधीही प्रशासनाच्या पातळीवरच खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.


कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ३९ कोटी ६१ लाखाचे अंदाजपत्रक मंजूर- मुख्य कार्यकारी अधिकारी -संतोष पाटील