बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 6 जानेवारी रोजी नांदणी येथील पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याला भेट; आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे
By nisha patil - 4/1/2025 10:29:59 PM
Share This News:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 6 जानेवारी रोजी नांदणी येथील पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याला भेट; आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी नांदणी येथे होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले होते. मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भेटीसाठी सकारात्मकता दाखवत सोमवार, 6 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता नांदणी येथे येण्याचे मान्य केले आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेबांनी नांदणी येथे भेट देऊन सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी सर्व तयारी व्यवस्थित पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक प्रशासन व समितीला मार्गदर्शन केले. सोहळ्यासाठी सर्व भक्त व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 6 जानेवारी रोजी नांदणी येथील पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याला भेट; आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे
|