राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Chief Minister Eknath Shinde is likely to go on a campaign tour to Karnataka


By surekha -
Share This News:



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला  जाण्याची शक्यता आहे.. मुख्यमंत्री आपल्या टीमसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सध्या मिळत आहे. बेळगावसह अन्य सीमाभागातही ते प्रचार करतील, अशी माहिती समोर येत आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तिथं सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि जेडीएसचं प्रमुख आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठीस जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा त्या ठिकाणच्या राजकीय हालचाली वाढत आहेत.  केंद्रात पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.  प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत.  महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे . भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली  या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील सहा जणांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश नाही.   
कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.


Chief Minister Eknath Shinde is likely to go on a campaign tour to Karnataka