बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Chief Minister Eknath Shindes birthday is celebrated with various activities


By nisha patil - 12/2/2024 11:17:50 PM
Share This News:



कोल्हापूर : महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर  यांच्या मार्गदर्शनानुसार व युवा नेते  ऋतुराज क्षीरसागर , पुष्कराज क्षीरसागर यांच्या पुढाकाराने रिंग रोड फुलेवाडी येथील समर्थ श्रावणी केअर सेंटर या वृद्धाश्रमात केक कापून व सर्व वयोवृद्धांना गोडाचे जेवण करून वाढदिवस साजरा करून साजरा करण्यात आला.  यावेळी त्यांच्या  दीर्घ व निरोगी आयुष्याचा आशीर्वाद वृद्धाश्रमातील सर्व लोकांनी दिला. 

वृद्ध लोकांविषयी असणारी आस्था व आपुलकी, त्यांच्याविषयी वाटणारी काळजी एकनाथ शिंदे यांनी "वयोश्री "ही योजना आणून त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम दाखवुन दिले आहे. यानिमित्ताने उपस्थित सर्व लोकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी  जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण,  महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव, रमेश खाडे,  सुरेश माने, अमोल माने, बंटी पाटील ,श्रीकांत पवार ,महिला शहर प्रमुख अमरजा पाटील ,निवेदिता तोरस्कर  यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा