बातम्या

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन

Chief Minister Shinde consoles the Kshirsagar family


By nisha patil - 4/13/2024 10:47:50 PM
Share This News:



कोल्हापूर  : प्रतिनिधी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांनी राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी भेट देवून क्षीरसागर कुटुंबियांना या दुख:द घटनेतून सावरण्यास आधार देत सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय कै.विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री .चंद्रकांतदादा पाटील, .धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर  आदी क्षीरसागर कुटुंबीय उपस्थित होते.


मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन