बातम्या

विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यास मुख्यमंत्री सक्षम : राजेश क्षीरसागर

Chief Minister able to free Vishalgarh encroachment Rajesh Kshirsagar


By nisha patil - 12/7/2024 8:49:08 PM
Share This News:



संकट समयी स्वराज्याला उर्जितावस्था देण्यात विशाळगडाने महत्वाचे योगदान दिले आहे. शूर मावळ्यांचे बलिदान छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श यासारख्या अत्यंत प्रेरणादायी घटनांनी या गडाचे पावित्र्य उंचावले आहे. गडकिल्यांना उर्जितावस्था देणे, गडावरील अतिक्रमणे दूर करणे यासाठी शासन कटिबद्ध असून, यापूर्वी कोणत्याच सरकारला न जमलेले काम म्हणजे प्रतापगडाखालील अफजल खानाच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महायुती सरकारने एका दिवसात जमीनदोस्त केले. त्यामुळे विशाळगडावर झालेले अतिक्रमण काढण्यास मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब सक्षम असल्याचा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 
  

 विशाळगड अतिक्रमण प्रश्नी शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ येथे बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.
  

 यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी,विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याबाबत सरकार कटिबद्ध असून, मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल असणाऱ्या खटल्यांमध्ये दि.१६ फेबुवारी २०२३ रोजी मा.उच्च न्यायालयाने अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाहीस स्थगिती दिली आहे. सदर खटल्याबाबत सुनावणी सुरु असून, काल दि.११ जुलै २०२४ रोजी सदर खटल्याची तारीख होती व सदरचा खटला ६१ व्या क्रमांकावर होता. मा.न्यायालयाने दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी अंतरिम स्थगिती कायम ठेवत सुनावणीची पुढील तारीख दिली आहे. अफजल खान्याच्या कबरी शेजारी झालेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय सुमारे २२ वर्षांपूर्वी मे.न्यायालयाने दिला होता. पण सदर अतिक्रमण काढण्याचे धाडस कोणत्याही सरकारने दाखविले नाही. पण, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी एका दिवसात हे अतिक्रमण उध्वस्थ केले. विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ बाब आहे. त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण करण्याच्या प्रयत्न करू नये. महायुती सरकार सर्वांना न्याय देणारे असून कोणताही जाती-भेद न ठेवता अनधिकृत अतिक्रमणावर नक्कीच कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी.
   यासह पन्हाळा - पावनखिंड मोहिमेस खासदार मा.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रु.१० कोटींचा निधी दिला आहे. आगामी काळात विशाळगड अतिक्रमण मुक्ती सह गडकिल्यांना उर्जितावस्था देण्याचे आणि तेथील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धनाचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब करतील असा विश्वास व्यक्त केला. 

 

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, दीपक चव्हाण, सुनील खोत, राज जाधव, राहुल चव्हाण, रविंद्र पाटील, अजिंक्य पाटील आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यास मुख्यमंत्री सक्षम : राजेश क्षीरसागर