बातम्या

मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार खासदारांची तातडीची बैठक

Chief Minister called an urgent meeting of MLAs and MPs


By nisha patil - 5/7/2023 4:46:18 PM
Share This News:



मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार खासदारांची तातडीची बैठक

राष्ट्रवादीचे नेते आणि नूतन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांसह महायुतीमध्ये प्रवेश केला मात्र या प्रवेशानंतर ज्यांच्यावर आजपर्यंत टीका केली त्यांचेच आता आदेश मानावे लागणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करून तातडीने सर्व आमदारांनी खासदारांची बैठक बोलावली असल्याची माहिती आहे आज सायंकाळी वर्षा बंगल्यावर सर्व आमदार खासदारांची बैठक होणार आहे आता या बैठकीत काय निर्णय होणार आणि कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलय.


मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार खासदारांची तातडीची बैठक