बातम्या

मुख्यमंत्र्यांची राजस्थानात सुद्धा हवा

Chief Minister is also wanted in Rajasthan


By nisha patil - 3/15/2024 6:47:31 PM
Share This News:



शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात राज्यभरातून इनकमिंग सुरु आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात देशभराही चर्चा होत आहे. आता राजस्थानमधील भरतपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार डॉ. ऋतू बनावत यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. आमदार डॉ. ऋतू बनावत यांच्या पक्ष प्रवेशाने राजस्थानमध्ये शिवसेनेचे खाते उघडले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपलय सोशल मीडियावर दिली आहे 

ऋतू बनावत यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज खूप आनंदाचा दिवस आहे. ऋतू बनावत यांचे शिवसेनेत मी स्वागत करतो. अपक्ष लढून त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला. त्यांनी आतापर्यंत अनेक चांगली कामे केली आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. मी पण सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करता करता राज्याचा मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. आता माझ्यासोबत 50 आमदार, 13 खासदार आणि लाखो कार्यकर्ता आहेत. देशातील 23 राज्याचे शिवसैनिकांनी मला पाठिंबा दिला. मी जेव्हा उठाव केला, तेव्हा ही सर्व सोबत होती. सर्व ठिकाणी शिवसेना काम करत आहे. शिवाजी जी महाराज आणि महाराणा प्रताप दोघे महान आहे. मी पाच रुग्णवाहिका तुमच्या परिसरासाठी देत आहे.असे ते म्हणाले


मुख्यमंत्र्यांची राजस्थानात सुद्धा हवा