बातम्या
मुख्यमंत्र्यांनी परदेश दौरा ढकलला पुढे
By nisha patil - 9/26/2023 7:11:43 PM
Share This News:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित परदेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . हा दौरा नेमका कधी होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत हे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत 1 ऑक्टोबर रोजी परदेश दौऱ्यावर जाणार होते. इंग्लंड आणि जर्मनी असा दहा दिवसांचा त्यांचा परदेश दौरा होता. परंतु आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी आणि इतर खासगी कारणांच्या पार्श्वभूमीवर या परदेश दौऱ्यात बदल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी परदेश दौरा ढकलला पुढे
|