बातम्या

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी; ५ तारखेला शपथविधी सोहळा

Chief Ministerial responsibility to Devendra Fadnavis


By nisha patil - 11/29/2024 7:54:39 PM
Share This News:



देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी; ५ तारखेला शपथविधी सोहळा

राज्यात महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी चाललेला सस्पेंस अखेर संपला आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले असून, राज्यात तीन प्रमुख नेत्यांच्या सहकार्याने पुढील सरकार स्थापन होणार आहे.

या निर्णयानंतर भाजप व महायुतीच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फडणवीस यांचे नेतृत्व, प्रशासनाचा अनुभव, आणि निर्णयक्षमता राज्याच्या पुढील विकासासाठी फायदेशीर ठरेल, अशी चर्चा आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला भाजप आणि महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.


देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी; ५ तारखेला शपथविधी सोहळा
Total Views: 1