बातम्या
मुख्यमंत्री यांचा ३ मार्चला इचलकरंजीत महिला मेळावा
By nisha patil - 2/24/2024 11:29:35 PM
Share This News:
मुख्यमंत्री यांचा ३ मार्चला इचलकरंजीत महिला मेळावा
सभा कोरोची गावाच्या मैदानावर होणार आहे
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर प्रतिनिधी : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ३ मार्च २०२४ रोजी
इचलकरंजी येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.
इचलकरंजी शहराजवळील कोरोची गावातील मैदानावर रविवारी ३ मार्च रोजी सक्षमीकरण अभियान अंतर्गत कार्यक्रमावर महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी घेतला. यावेळी त्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या. खासदार धैर्यशील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, माविम जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होते.
तीन मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी येडगे यांनी संबंधित विभागांना लाभार्थी निवड, कार्यक्रमाचे ठिकाण, आसन व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, प्रदर्शनी, मोबाईल टॉयलेटस, आवश्यक वैद्यकीय पथक, अल्पोपहार व पिण्याचे पाणी तसेच मंडप याबाबत आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्या. प्रत्येक तालुक्यातून महिलांना या कार्यक्रमासाठी बोलविण्यात येणार आहे. या अनुषंगाने एसटी बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
महिला शक्तीचे होणार दर्शन मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला येणार आहेत. वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून मिळालेले लाभही त्यांना वितरीत केले जाणार आहेत. तसेच जिल्हयातील निवडक महिलांच्या बचत गटांचे स्टॉल्स या मेळाव्याच्या ठिकाणी लावले जाणार आहेत. शासकीय विभागातील महिलांविषयी असणाऱ्या योजनांचे स्टॉल्सही महिला अधिकारी व कर्मचारी चालविणार आहेत. या महिला मेळाव्यात स्त्रीशक्तीचे दर्शनच होणार आहे असे प्रशासनाने म्हटले आहे.
मुख्यमंत्री यांचा ३ मार्चला इचलकरंजीत महिला मेळावा
|