बातम्या

मुख्यमंत्र्यांची नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराला भेट

Chief Ministers visit to Datta Mandir at Nrisimhwadi


By nisha patil - 5/5/2024 4:47:01 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील सिध्दक्षेत्र येथील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराला भेट देऊन श्री दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यावेळी स्थानिक नागरिकांच्या साथीने दत्तगुरूंची आरती केली. तसेच मंदिर संस्थानच्या वतीने केलेल्या सन्मानाचा विनम्रपणे स्वीकार केला. 
 

त्यासोबतच जयसिंहपूर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या तख्ताला विनम्रपणे अभिवादन केले.
 

यावेळी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील यड्रावकर तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांची नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराला भेट