बातम्या
लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर व हातकलंगले दौरा
By neeta - 12/29/2023 4:28:21 PM
Share This News:
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघात मिळावे दौरा होणार आहेत. यामध्ये 29 जानेवारीला कोल्हापूर आणि 30 जानेवारीला हातकलंगले लोकसभा मतदारसंघात मिळावे होणार आहेत अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली
ते म्हणाले, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेतील मंत्री वरिष्ठ ,पदाधिकारी यांची बैठक झाल. यश शिव संकल्प अभियानाद्वारे सहा जानेवारी 2024 पासून राज्यभरात मिळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे राज्यभरातील जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख आणि मुख्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय झाला. बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. कुठला पक्ष लढवणार उमेदवार कोण मतदार संघ कोणाला सोडणार, याबाबत सारख्या अफवा विरोधकाकडून बसवल्या जात आहेत. यापुढेही फसवल्या जातील त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ,आपण आपल्या सर्व जागा ताकतीने लढू या जिंकूया व आपली महायुती विजयी करूया. केलेल्या कामावर आपण मते मागू या असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले. त्याशिवाय शिव संकल्प अभियानातील दौरे जाहीर केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
राम प्रतिष्ठापना सोहळा साजरा करा
आयोजित 22 जानेवारी रोजी राम मंदिरात राम ललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. हा क्षण कायम लक्षात रहावा यासाठी घराबाहेर भगवा झेंडा लावावा गुडी उभाराव्यात जागोजागी दीपोत्सव साजरा करण्यात यावा असे आव्हान यावी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले
लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर व हातकलंगले दौरा
|